मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बसला भीषण आग

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बसला भीषण आग

लोणावळा (पुणे),२१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत एका खासगी प्रवासी बसला मध्यरात्री आग लागली. मध्यरात्री दोनच्या सुमारास या बसला अचानक आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत बस जळून खाक झाली आहे. या बसमधील अंदाजे ३५ प्रवासी आणि चालक सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आगीवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी भावना प्रवाशी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका बसला किलोमीटर ३९/९०० येथे आल्यानंतर बसमधून रात्रीच्या वेळी अचानक धूर येत असल्याचे पहायला मिळाले. ही गोष्ट बस चालकाच्या लक्षात आल्याने बस चालकाने प्रसंगावधान राखून त्वरित बस रस्त्याच्या कडेला लाव

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version