अक्कलकोटसह सोलापुरात अवकाळीचा तडाखा

अक्कलकोटसह सोलापुरात अवकाळीचा तडाखा

सोलापूर , २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : राज्याला एकीकडे प्रचंड उन्हाचा तडाखा बसतोय तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. गेल्या २ दिवसांपासून सोलापुरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे बऱ्याच गावांचा संपर्क देखील तुटलाय. तर या अचानक पावसामुळे शेती पिकांचं आणि फळबागांचे देखील नुकसान झाले आहे.

राज्यात बऱ्याच ठिकाणी सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. यात पुण्यासह राज्यातील बारा जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याचं देखील हवामान विषयक अंदाजात नमूद करण्यात आलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version