‘निवडणूक ईव्हीएमवरच’

‘निवडणूक ईव्हीएमवरच’

नवी दिल्ली, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभेची निवडणूक ईव्हीएमवरच होणार आहे. अठराव्या लोकसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी १९ एप्रिल रोजी पार पडेल. हे मतदान कशा प्रकारे होणार याचा संभ्रम आता दूर झाला आहे.

मतदान परंपरागत मतपत्रिकेवरच घ्यावे अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी प्रत्येक गोष्टीवर संशय घेणे बरे नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. प्रत्येक मतचिठ्ठीचा ताळेबंद हवा, अशीही मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने या विषयावरील निर्णय राखून ठेवला आहे.

मतपत्रिका समर्थकाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
प्रत्येक गोष्टीवर संशय घेणे बरे नाही – सर्वोच्च न्यायालय
प्रत्येक मतचिठ्ठीचा ताळेबंद हवा, याचिकाकर्त्यांची मागणी
न्यायालयाने निकाल राखून ठेवला

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version