नवी दिल्ली, १५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दारू घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. दिल्लीच्या राउस अॅन्हेन्यू न्यायदंडाधिकाऱ्यांनी केजरीवाल यांना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. यामुळे केजरीवालांचा तिहार तुरुंगातील मुक्काम २३ एप्रिलपर्यंत वाढला आहे.
ईडीने दारू घोटाळ्यात केजरीवालांना अटक केली होती. केजरीवालांना काही दिवस ईडी कोठडीत ठेवण्यात आले. यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. सध्या दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल आणि भारत राष्ट्र समितीच्या के. कविता हे दोघेही तिहारमध्ये आहेत.
दिल्ली दारू घोटाळा
केजरीवाल आणि के. कविताला न्यायालयीन कोठडी
दोघांना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
तिहार तुरुंगातील मुक्काम वाढला
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.