‘राम मंदिर मोदींमुळेच उभं राहिलं’

‘राम मंदिर मोदींमुळेच उभं राहिलं’

मुंबई, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अयोध्येत राम मंदिर मोदींमुळेच उभं राहिलं, असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला तरी मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं, असं सांगत मंदिर निर्मितीचे श्रेय राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.

गुजरातचा दौरा केल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया म्हणून मोदींना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला. नंतर अपेक्षा उंचावल्या होत्या आणि यातून काही काळ विरोध केला. पण मोदींच्या नेतृत्वात सुरू असलेल्या कामाची जाणीव झाल्यावर परत एकदा मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version