गडचिरोली, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मोदी विरोधकांची गाडी रुळावरुन घसरली आहे, त्यांच्यात एकवाक्यता नाही की नियोजन नाही. याउलट मोदींच्या नेतृत्वात भाजपा देशहितासाठी कार्यरत आहे. वेगाने विकासकामं करत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या अशोक नेते यांचा प्रचार करण्यासाठी सभा घेत होते. मोदींच्या नेतृत्वात नियोजनबद्ध विकास सुरू आहे. केंद्रातले मोदी सरकार आणि राज्यातले महायुती सरकार यांनी परस्पर समन्वयातून विकासकामांचा धडाका लावला असल्याचे फडणवीस म्हणाले. अशोक नेते यांना मत म्हणजे मोदींना मत; असेही फडणवीस यांनी प्रचारसभेत सांगितले. गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघातील विकासाला आणखी गती देणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.