शिवसेनेच्या मेळाव्यांचा धडाका सुरूच

शिवसेनेच्या मेळाव्यांचा धडाका सुरूच

ठाणे, प्रतिनिधी, १२ एप्रिल २०२४ : लोकसभेचे बिगुल वाजल्यानंतर अनेक पक्ष आता तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून अद्याप महायुतीच्या अनेक जागांचा निकाल आणि उमेदवारी जाहीर झाली नसल्याने अनेक पेच देखील निर्माण आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणारा ठाणे लोकसभा मतदारसंघ या जागेवर देखील उमेदवार अद्याप जाहीर झाला नसला तरी महायुतीकडून आणि शिवसेनेकडून कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यांचा धडाका सुरूच आहे. उमेदवार कोणीही असला तरी चालेल पण सर्वाधिक मताधिक्याने ठाणे लोकसभा मतदारसंघातून त्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन सर्वच पदाधिकारी आणि नेते करताना आहेत. उमेदवार जाहीर झाला नसला तरी सुद्धा आमच्यासमोर उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत असं समजून कामाला लागा असे आवाहन देखील सर्वच नेत्यांनी कार्यकर्त्यांना मेळाव्यात केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version