सांगलीबाबत काय म्हणाले विश्वजीत कदम ?

सांगलीबाबत काय म्हणाले विश्वजीत कदम ?

सांगली, १० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सांगलीतील राजकीय स्थिती आणि सत्य वस्तुस्थितीची पारख करुन येथील लोकसभेच्या उमेदवाराबाबत फेरविचार करावा, अशी विनंती काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केली. सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेला निर्णय स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवडलेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आम्ही राज्यभरातील काँग्रेस पदाधिकारी आणि नेत्यांशी संवाद साधून सांगली लोकसभेच्या जागेबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचा विचार करू, असे विश्वजित कदम यांनी सांगितले.

जागा वाटपाबाबत ज्या बैठका झाल्या त्या सगळ्या बैठकांत सांगलीची जागा आपल्याला मिळायला हवी, ही भावना आम्ही सातत्याने मांडली. सांगलीत काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. याशिवाय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतींमध्येही मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या विचारांचे प्रतिनिधी आहेत. ही काँग्रेसची मजबूत बाजू आहे. त्यामुळे इथली जागा काँग्रेसला मिळणे संयुक्तिक आहे, असे विशाल पाटील म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version