नांदेड जिल्ह्याला पाच दिवसांचा यलो अलर्ट जारी

नांदेड जिल्ह्याला पाच दिवसांचा यलो अलर्ट जारी

नांदेड , प्रतिनिधी, दि. १० एप्रिल २०२४ : मंगळवारी (दि. ९ एप्रिल २०२४) दुपारनंतर ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मराठवाड्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. ज्वारी, हळद आणि आंब्यासह अन्य पिकांना या पावसाचा तडाखा बसला. नांदेड शहरासह जिल्ह्यात सायंकाळी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बाजारपेठेत तारांबळ उडाली. नांदेड तालुक्यातील मरळक, लिंबगाव, विष्णुपुरी, कुरुळा, फुलवळ, मानसपुरी (ता. कंधार), लोहा तालुक्यातील मारतळ्यासह परिसर, बरबडा (ता. नायगाव), अर्धापूरमध्ये पाऊस झाला. भोकरला हलक्या सरी पडल्या. या पावसामुळे उन्हाळी ज्वारी, भुईमूग, शिजवून वाळत ठेवलेल्या हळदीसह आंब्याचे नुकसान झाले. दरम्यान, नांदेड जिल्ह्यासाठी ८ ते १२ एप्रिल दरम्यान यलो अलर्ट जारी केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version