‘केजरीवालांची अटक वैध’

‘केजरीवालांची अटक वैध’

नवी दिल्ली, ९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली. केजरीवाल यांना कायद्यातील तरतुदींनुसार अटक झाली आहे. ही अटक वैध आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले.

तपास करून ईडीने हाती आलेल्या माहितीआधारे केजरीवाल यांना अटक केली आहे. ईडीने केजरीवाल यांच्यावर आर्थिक गुन्हा करण्यासाठी रचलेल्या कटाचा सूत्रधार असल्याचा आरोप केला आहे. आतापर्यंत केलेल्या तपासाअंती ईडीने हा आरोप केला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आम आदमी पक्ष सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार करत आहे.

दिल्ली उच्च न्यायालय काय म्हणाले ?

याचिका जामिनासाठी नसून कोठडीला आव्हान देण्यात आले आहे. आपली अटक चुकीची असल्याचे याचिकाकर्त्याने म्हणणे आहे

दिल्लीचे दारू धोरण तयार करणे आणि धोरण राबवण्याच्या निमित्ताने लाच घेणे यात केजरीवाल गुंतल्याचा आरोप आहे. ईडीने तपासाआधारे आरोप केला आहे.

साक्षी – पुरावे नोंदवताना कायद्याचे पालन केले आहे.

अटक कायद्यातील तरतुदींचे पालन करून झाली आहे. चौकशीसाठीचा रिमांड आणि नंतरची न्यायालयीन कोठडी ही प्रक्रिया पण कायद्यातील तरतुदींचे पालन करून झाली आहे.

आर्थिक घोटाळा प्रकरणात अटकेची कारवाई करण्याचे अधिकार ईडीला आहेत. कोणाला कधी अटक करावे याचा निर्णय घेण्यास ईडी समर्थ आहे. अटकेची वेळ ईडी ठरवते.

न्यायालयातले निर्णय कायद्याच्या चौकटीत राहून केले जातात. राजकारणाला न्यायालयात स्थान नाही. न्यायालयात केजरीवाल विरुद्ध ईडी हा खटला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version