चंद्रपुरात मोदींच्या सभेतून विजयाचा संकल्प

चंद्रपुरात मोदींच्या सभेतून विजयाचा संकल्प

चंद्रपूर, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : चंद्रपूर येथे घेतलेल्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचा संकल्प केला. मोदींनी चंद्रपूरच्या सभेतून सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक नेते या दोघांना तसेच महायुतीच्या इतर उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. प्रत्येक बूथवर आधीच्या तुलनेत जास्त मतदान करा आणि अधिकाधिक मतांनी महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांनी विजयी करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

मोदींच्या भाषणाची मराठीतून सुरुवात
आंबेडकरांना नमन करत मोदींच्या भाषणाची सुरुवात
पंतप्रधानांनी मराठीतून दिल्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

महाराष्ट्रातून महायुतीच्या प्रचाराचा नारळ

चंद्रपूरकडून भरभरून प्रेम मिळाले – मोदी
राम मंदिर निर्माणात चंद्रपूरचा मोठा वाटा – मोदी
नव्या संसदेतही चंद्रपूरच्या लाकडांचा वापर – मोदी
सत्ता आल्यावर फक्त लुटा, विरोधकांचा मंत्र – मोदी
अनेक चांगल्या योजना काँग्रेसने अडकवल्या – मोदी
काँग्रेस म्हणजे कमिशनखोर – मोदी
काँग्रेसचं सरकार म्हणजे कमिशनखोरांचं सरकार – मोदी
इंडी आघाडीने दक्षिण भारताला देशापासून तोडण्याचा कट रचला – मोदी
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची भाषा – मोदी
काँग्रेसने काश्मीरची समस्या निर्माण केली – मोदी
काँग्रेसच्या काळात दहशतवाद फोफावला – मोदी
काँग्रेस सगळ्या समस्यांचे मूळ – मोदी
रालोआने अडचणींवर मात केली – मोदी
रालोआने समस्या सोडवल्या – मोदी

सभेत कोण काय म्हणाले ?

काँग्रेस काळ म्हणजे घोटाळ्यांचा काळ – एकनाथ शिंदे

चंद्रपूर : ‘महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा’
देवेंद्र फडणवीसांचे मतदारांना आवाहन

काँग्रेसला मत म्हणजे माफियांना मत – मुनगंटीवार
काँग्रेसला मत म्हणजे विनाशाला मत – मुनगंटीवार

पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला

लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी पार पडेल आणि मतमोजणी ४ जून रोजी होईल. महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदिया, गडचिरोली – चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

पहिल्या टप्प्यातील महायुतीचे उमेदवार

रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदिया, गडचिरोली – चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघांतून महायुतीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. रामटेकमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर राजू पारवे निवडणूक लढवत आहेत. इतर चार मतदारसंघांमध्ये भाजपाच्या तिकिटावर उमेदवार निवडणूक लढवत आहेत. नागपूरमधून नितीन गडकरी, भंडारा – गोंदियातून सुनिल मेंढे, गडचिरोली – चिमूरमधून अशोक नेते, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढवत आहेत.

अशी होणार लढत

रामटेक – राजू पारवे, शिवसेना विरुद्ध श्याम बर्वे, काँग्रेस विरुद्ध किशोर गजभिये, वंचितचा पाठिंबा असलेले काँग्रेसचे बंडखोर विरुद्ध संदीप मेश्राम, बसप विरुद्ध सिध्देश्वर बेले, रिपाईं
नागपूर – नितीन गडकरी, भाजपा विरुद्ध विकास ठाकरे, काँग्रेस विरुद्ध योगीराज लांजेवार, बसप
भंडारा – गोंदिया – सुनिल मेंढे, भाजपा विरुद्ध डॉ. प्रशांत पडोले, काँग्रेस विरुद्ध संजय केवट, वंचित
गडचिरोली – चिमूर – अशोक नेते, भाजपा विरुद्ध नामदेव किरसान, काँग्रेस विरुद्ध हितेश मडावी, वंचित विरुद्ध योगेश गोंदे बसप
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार, भाजपा विरुद्ध प्रतिभा धानोरकर, काँग्रेस विरुद्ध राजेश बेले, वंचित

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version