नवी दिल्ली, ५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात असलेल्या केजरीवालांना दिलासा मिळाला आहे. केजरीवालांच्या विरोधात करण्यात आलेली याचिका दिल्लीच्या उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. केजरीवाल तुरुंगात आहेत, यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. ही मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. केजरीवाल सध्या दिल्लीच्या तुरुंगात आहेत. त्यांना दिल्लीच्या राउस अॅव्हेन्यू न्यायदंडाधिकाऱ्यांनी १५ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.