संजय राऊतांना प्रकाश आंबेडकरांचा सवाल

संजय राऊतांना प्रकाश आंबेडकरांचा सवाल

मुंबई, २८ मार्च २०२४, प्रतिनिधी : संजय राऊत, किती खोटं बोलणार ? असा रोखठोक सवाल करणारे ट्वीट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. या ट्वीटमधून प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांवर प्रश्नांच्या फैरी झाडल्या आहेत आणि मविआच्या बैठकांमधील घडामोडींबाबतची ‘सच्चाई’ सांगितली आहे.

मविआची मुंबईतील एका हॉटेलमध्ये ६ मार्च रोजी बैठक झाली. या बैठकीला मविआतील घटक पक्ष आणि वंचितचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीनंतर झालेल्या मविआच्या बैठकांमध्ये वंचितला बोलावलेच नव्हते; असे ट्वीटद्वारे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. प्रकाश आंबेडकरांच्या अकोला मतदारसंघात मविआचे उमेदवार उभे करण्याबाबत शरद पवारांच्या मुंबईतील बंगल्यावर चर्चा झाली. एकीकडे वंचितला सोबत घेणार म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधात डाव खेळायचे असे प्रकार घडल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. संजय राऊत यांनी वंचितच्या पाठीत खंडीर खुपसला असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. हा आरोप करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी एक चित्र ट्वीट केले. या चित्रात वंचितच्या पाठीत खंजीर खुपसत असलेल्या हातावर संजय राऊत असे लिहिलेले दिसत आहे.

मविआसोबत आघाडी होणे अशक्य आहे याची जाणीव झाल्यानंतरच उमेदवारांची यादी जाहीर केल्याची भूमिका वंचितने घेतली आहे. वंचितने आतापर्यंत आठ उमेदवार जाहीर केले आहेत आणि तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचितचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवणार आहेत. वंचितने कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या शाहू छत्रपतींना, नागपूरमध्ये काँग्रेसच्या विकास ठाकरेंना आणि सांगलीत प्रकाश शेंडगेंच्या पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ – वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी

१. भंडारा गोंदिया – संजय केवत
२. गडचिरोली-चिमूर – हितेश मडावी
३. चंद्रपूर – राजेश बेले
४. बुलडाणा – वसंतराव मगर
५. अकोला – प्रकाश आंबेडकर
६. अमरावती – प्राजक्ता पिल्लेवान
७. वर्धा – प्रा. राजेंद्र साळूंके
८. यवतमाळ-वाशिम – खेमसिंग पवार
अ. कोल्हापूर – काँग्रेस उमेदवार शाहू छत्रपती यांना पाठिंबा
ब. नागपूर – काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा
क. सांगली – प्रकाश शेंडगेंच्या पक्षाला पाठिंबा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version