वंचितचे ‘एकला चलो रे’

वंचितचे ‘एकला चलो रे’

मुंबई, २७ मार्च २०२४, प्रतिनिधी : वंचितच्या जागांच्या मागणीला मविआकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. अद्याप वंचितच्या जागांबाबत मविआने निर्णय घेतलेला नाही. या प्रकारामुळे नाराज झालेल्या वंचितने मविआला विसरून स्वतंत्रपणे लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर वंचितने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीद्वारे वंचितने आठ उमेदवार जाहीर केले. अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचितचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवणार आहेत. वंचितने कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या शाहू छत्रपतींना, नागपूरमध्ये काँग्रेसच्या विकास ठाकरेंना आणि सांगलीत प्रकाश शेंडगेंच्या पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ – वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी

१. भंडारा गोंदिया – संजय केवत
२. गडचिरोली-चिमूर – हितेश मडावी
३. चंद्रपूर – राजेश बेले
४. बुलडाणा – वसंतराव मगर
५. अकोला – प्रकाश आंबेडकर
६. अमरावती – प्राजक्ता पिल्लेवान
७. वर्धा – प्रा. राजेंद्र साळूंके
८. यवतमाळ-वाशिम – खेमसिंग पवार
अ. कोल्हापूर – काँग्रेस उमेदवार शाहू छत्रपती यांना पाठिंबा
ब. नागपूर – काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा
क. सांगली – प्रकाश शेंडगेंच्या पक्षाला पाठिंबा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version