नाशकात पाणीटंचाई; दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत

नाशकात पाणीटंचाई; दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत

नाशिक, २६ मार्च २०२४, प्रतिनिधी : नाशिक शहरात पुन्हा दोन दिवस पाणी बाणी असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. शहरातील अर्ध्या भागात बुधवारी आणि गुरूवारी पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. नाशिक शहर परिसरातील जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी सुरू असलेली गळती थांबवण्याचे काम सुरू होणार असल्याने पाणीपुरवठा बंद राहणार आहे. हा पाणीपुरवठा सातपूर, सिडको आणि नाशिक पश्चिम भागात बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच गुरूवारी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल. या पार्श्वभूमीवर नाशिक मनपा प्रशासनाकडून शहरातील नागरिकांना दोन दिवस पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version