औषधांचा तुटवडा; औषधकेंद्रांना औषधांचा पुरवठा नाही

औषधांचा तुटवडा; औषधकेंद्रांना औषधांचा पुरवठा नाही

पुणे, २४ मार्च २०२४, प्रतिनिधी : पुण्यातील रिक्षाचालकाच्या १६ वर्षीय मुलीला तीन महिन्यांपूर्वी क्षयरोगाचे निदान झाले. मात्र, गेल्या एक महिन्यापासून त्यांना औषधांचा तुटवडा जाणवायला लागला. मुलीसाठी औषध घेण्यासाठी ते हेलपाटे मारत होते. शेवटी ते पुणे महानगरपालिकेच्या क्षयरोग केंद्रात गेले. तेथे त्यांना सांगितले गेले की, औषधे मिळतील; पण फक्त २ दिवसांसाठीच! केवळ पुण्यातच नव्हे तर राज्यभरात क्षयरोगाच्या औषधांसाठी दाही दिशांना वणवण करत फिरावे लागत आहे. क्षयरोगाचा विळखा कमी करण्यासाठी दरवर्षी २४ मार्च हा ‘जागतिक क्षयरोग दिन’ पाळण्यात येतो. केंद्र शासनाने २०२५ ला क्षयरोग निर्मूलन करण्याचेही ध्येय ठेवलेले आहे. क्षयरोगाची औषधे केंद्राकडून राज्याला येतात. मात्र, येथे राज्य क्षयरोग विभागाच्या काही औषधकेंद्रांना औषधांचा पुरवठा नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version