मुंबई, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक घोषणा केली. महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा २६ मार्चपर्यंत सुटला नाही तर वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे आंबेडकरांनी सांगितले.
कोल्हापूरमधून लोकसभेसाठी काँग्रेसने शाहू महाराजांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीला वंचितचा पाठिंबा असल्याचे आंबेडकर म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.