छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला पोलिसाचा विनयभंग

छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला पोलिसाचा विनयभंग

छत्रपती संभाजीनगर, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपीची चौकशी करण्यासाठी गेलेल्या ऑन ड्युटी महिला पोलिसाला मारहाण करून विनयभंग केला आहे. छावणी पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला पोलिस कर्मचारी नंदनवन कॉलनी येथे तीन आरोपींची चौकशी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एका आरोपीने त्यांच्याशी वाद घालत शर्टची कॉलर पकडून शिवीगाळ केली. तर दुसऱ्या आरोपीने पोलिस ठाण्यात येऊन शिवीगाळ करून विनयभंग करत शासकिय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी महिला पोलिस कर्मचारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version