मविआचं जागावाटप ठरेना

मविआचं जागावाटप ठरेना

मुंबई, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. पण अद्याप जागावाटप जाहीर झालेले नाही. भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्याआधी दोन याद्यांमधून १९५ उमेदवार जाहीर केले. यात महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. तर काँग्रेसने त्यांच्या दोन याद्यांमधून शंभरपेक्षा कमी उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेस महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही.

सतत बैठका सुरू असल्या तरी महाविकास आघाडीतील कोणता पक्ष राज्यात कोणत्या जागा लढवणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. मुंबईत गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जागावाटप दोन दिवसांत होईल असा विश्वास व्यक्त केला. कोणती जागा कोण लढवणार या विषयावर सविस्तर बोलणे त्यांनी टाळले. यामुळे मविआच्या जागावाटपाचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याचे पुन्हा एकदा जगजाहीर झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version