काँग्रेस भाजपापेक्षा कमी जागा लढवणार ?

काँग्रेस भाजपापेक्षा कमी जागा लढवणार ?

मुंबई, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस महाराष्ट्रात भाजपापेक्षा कमी जागा लढवणार असल्याचे वृत्त आहे. भाजपाने महाराष्ट्रातील उमेदवारांची एक यादी जाहीर केली आहे. यात वीस उमेदवारांच्या नावांचा उल्लेख आहे. भाजपाच्या आणखी काही उमेदवारांच्या नावांची घोषणा लवकरच होणार आहे. ही घोषणा होण्याआधीच काँग्रेस महाराष्ट्रात भाजपापेक्षा कमी जागा लढवणार असल्याचे वृत्त आले आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस चौदा ते अठरा जागा लढवण्याचा विचार करत आहे. या जागांवर कोण उमेदवार असतील याबाबत विचार सुरू आहे. यामुळे काँग्रेसने राज्यातील एकाही उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही.

दिल्लीत पार पडलेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत जागा वाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राज्यसभा खासदार सोनिया गांधी, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत राज्यातील उमेदवारांबाबत चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version