शिवसेना ३ खासदारांचे तिकीट कापणार ?

शिवसेना ३ खासदारांचे तिकीट कापणार ?

मुंबई, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत शिवसेना खासदारांसोबत चर्चा केली. पुढील एक – दोन दिवसांत शिवसेना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. ही यादी जाहीर करताना विद्यमान खासदारांपैकी किमान तीन जणांचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उमेदवारांची यादी दोन दिवसांत जाहीर होईल, असे सांगितले. याआधी राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे आणि भावना गवळी या तीन खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीनंतर राहुल शेवाळे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

शिवसेनेने रालोआचा घटक पक्ष म्हणून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २३ जागा लढवल्या. या २३ जागांपैकी १८ जागांवर भाजपाचा विजय झाला. नंतर शिवसेनेत फूट पडली. शिउबाठा आणि शिवसेना असे दोन पक्ष झाले. सध्या शिवसेनेकडे दहापेक्षा जास्त खासदार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version