राज ठाकरे चार दिवसांत दुसऱ्यांदा दिल्लीला

राज ठाकरे चार दिवसांत दुसऱ्यांदा दिल्लीला

नवी दिल्ली, १८ मार्च २०२४, प्रतिनिधी : भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ मनसे प्रमुख राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांची चार दिवसांतली ही दुसरी दिल्ली वारी आहे. यामुळे मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मनसे लोकसभेची निवडणूक लढवणार अशीही चर्चा सुरू झाली आहे. महायुतीकडून आतापर्यंत एक यादी जाहीर झाली आहे. भाजपाने वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यात लोकसभेचे ४८ मतदारसंघ आहेत. यापैकी २० साठी भाजपाने उमेदवार जाहीर केल्यामुळे उर्वरित २८ जागांवर महायुतीकडून कोण – कोण उमेदवार असतील यावरून तर्कवितर्क लढवले जात असतानाच राज दिल्लीला रवाना झाले आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version