धुळ्यात पोलीस प्रशिक्षण केंद्रात विषबाधा

धुळ्यात पोलीस प्रशिक्षण केंद्रात विषबाधा

धुळे, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली. सुमारे २०० ते २५० जणांना विषबाधा झाली. विषबाधा झालेल्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

पोलीस प्रशिक्षण केंद्रात जेवण झाल्यानंतर अनेकांना त्रास होऊ लागला. पोटदुखी, उलटी होणे, डोके दुखणे, मळमळणे अशा स्वरुपाचे त्रास अनेकांना होऊ लागले. जेवणातून विषबाधा झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला. ज्यांची तब्येत बिघडली त्या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती सावरली आहे. आता विषबाधा झालेल्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version