निवडणूक रोख्यांची माहिती सार्वजनिक

निवडणूक रोख्यांची माहिती सार्वजनिक

नवी दिल्ली, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत निवडणूक रोख्यांची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. याआधी ही माहिती भारतीय स्टेट बँकेने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली. निवडणूक आयोगाने ही माहिती पीडीएफ फाईलच्या स्वरुपात त्यांच्या वेबसाईटवर सार्वजनिक केली आहे.

निवडणूक रोख्यांची माहिती

निवडणूक रोख्यांचा तपशील केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर सार्वजनिक केला आहे. या तपशिलात देणगी आणि देणगीदारांची नावे ही माहिती आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणत्या व्यक्ती वा खासगी आस्थापनाने किती देणगी दिली तसेच कोणत्या राजकीय पक्षाला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून किती देणगी मिळाली याचे आकडे निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version