संभाजीनगरच्या जागेचा मविआचा तिढा सुटला?

संभाजीनगरच्या जागेचा मविआचा तिढा सुटला?

प्रतिनिधी, संभाजीनगर, दि. १३ मार्च २०२४ : महाराष्ट्राच्या राजकारणात बंड, पक्ष बदली, पक्ष आणि चिन्ह यातील तिढा तर सुटला आणि महायुतीची प्रस्थापित झाली. परंतु, आता मात्र लोकसभा निवडणूक तोंडावर आल्या असताना याच महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटत सुटेना अशी गत झाली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम असतानाच, छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा आता उद्धव गटाकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणूकीचं छत्रपती संभाजीनगरमधील उद्धव गटाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. महाविकास आघाडीत अजूनही जागावाटपाचा निर्णय झाला नाही, मात्र ज्याप्रमाणे उद्धव गटाकडून प्रचार कार्यालयाचे काम सुरु केले जात आहे, त्यानुसार संभाजीनगरची जागा उद्धव गटाकडे राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.


विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हे कार्यालय उभारले जाणार आहे, त्याच ठिकाणी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे लोकसभा निवडणुकीचे प्रचार कार्यालय असण्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उमेदवारी देखील खैरे यांना निश्चित झाली असल्याची चर्चा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version