कोलकाता, १२ मार्च २०२४, प्रतिनिधी : केंद्रातील मोदी सरकारने सोमवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (CAA) अधिसूचना जारी केली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हे मोठे पाऊल असल्याचे बोलले जात आहे. यावरून विरोधी पक्षांनीही भाजपावर हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रमजान सुरू होत आहे हे लक्षात घेऊन भाजपने हा दिवस निवडला, असा आरोप ममता यांनी केला. आम्ही सीएए स्वीकारत नाही आणि स्वीकारणारही नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.