राज्यातील ५०६ प्रकल्पांचे मंगळवारी भूमिपूजन, उद्घाटन

राज्यातील ५०६ प्रकल्पांचे मंगळवारी भूमिपूजन, उद्घाटन

नवी दिल्ली, ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन, स्थानकांवरील स्टॉल्सचे उद्घाटन, नवीन गाडयांना हिरवा झेंडा दाखविणे अशा तब्बल ५०६ प्रकल्पांचे उद्घाटन किंवा भूमिपूजन मंगळवारी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दृकश्राव्य माध्यमातून या सोहळयांना उपस्थित राहणार आहेत. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मंत्री सहभागी होतील. यात ‘वन स्टेशन, वन प्रॉडक्ट’ स्टॉल्सच्या उद्घाटनासह काही प्रकल्पांचे भूमिपूजन आणि नवीन गाडयांना हिरवा झेंडा दाखविण्याचा समावेश आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version