बारामती, ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : बारामती लोकसभा मतदारसंघातील शरद पवारांचा एक मेळावा रद्द झाल्याचे वृत्त येत आहे. बारामतीतील व्यापाऱ्यांनी हा नियोजीत मेळावा रद्द केल्याचे समजते. आतापर्यंत व्यापारांनी ठरवलेला पवारांचा मेळावा रद्द झाला नव्हता. पण यावेळी हा प्रकार झाल्याचे वृत्त आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या पाच दशकांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही घटना घडल्याची चर्चा आहे.
पवारांचे सोमवार ११ मार्चचे चार मेळावे
होलार समाज मेळावा – मेळावा झाला
बारामतीतील व्यापाऱ्यांचा मेळावा – मेळावा रद्द
बारामतीतील वैद्यकीय व्यवसायिकांचा मेळावा – मेळावा झाला
बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील वकिलांचा मेळावा – मेळावा झाला
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.