देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर

देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर

पुणे, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी रात्री कसब्यात अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले होते. यानंतर तणाव निर्माण झाला होता. काही काळ पाच – सात हजार मुसलमान रस्त्यावर आले होते. पोलिसांनी रस्त्यावर आलेल्यांची समजूत काढली. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. शुक्रवारी घडलेल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस शनिवारी पुण्याचा दौरा करत आहेत. ते पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तसेच संध्याकाळी चार वाजता भांडारकर संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. भोसरी येथे महेश लांडगे यांच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version