कलम ३७० हटवल्यानंतर मोदींचा पहिला काश्मीर दौरा

कलम ३७० हटवल्यानंतर मोदींचा पहिला काश्मीर दौरा

प्रतिनिधी, श्रीनगर, दि. ०७ मार्च २०२४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी जम्मू-काश्मीरला भेट देणार आहेत. ५ ऑगस्ट २०१९ रोजी गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधलं कलम ३७० हटवलं. त्यानंतर पहिल्यांदाच ते जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी ते राज्याला ६४०० कोटी रुपयांचा विकास प्रकल्प भेट देतील आणि १००० तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्र देतील. पंतप्रधान मोदी श्रीनगरमधील बक्षी स्टेडियममध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. यापूर्वी २०२९ मध्ये नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये प्रचारासाठी गेले होते. पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात श्रीनगरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या जाहीर सभेत २ लाखांहून अधिक लोक सहभागी होतील, असा भाजपचा दावा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version