माढ्यावर अजित पवारांचा दावा

माढ्यावर अजित पवारांचा दावा

माढा, ४ मार्च २०२४, प्रतिनिधी : माढा लोकसभा मतदारसंघावर आता राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. भाजपामध्ये उमेदवारीचा तिढा सुटत असताना आता रामराजे निंबाळकर यांनी पंढरपुरात बैठक घेऊन माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा अशी भूमिका मांडली आहे. याबाबत सहा मार्च रोजीच्या पक्षाच्या बैठकीत सविस्तर बोलणार असल्याचे निंबाळकर म्हणाले.

बारामतीत सुनेत्रा पवार

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा अजित पवार यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल आणि त्याच बारामतीतल्या महायुतीच्या लोकसभेसाठीच्या उमेदवार असतील, असे संकेत भाजपाच्या चित्रा वाघ यांनी दिले. महाराष्ट्रातल्या उमेदवारांच्या बाबतीत चर्चा सुरू आहे. यामुळे भाजपाच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराचे नाव नव्हते; असेही चित्रा वाघ म्हणाल्या. महाराष्ट्रातल्या कोणत्या जागेवरून कोण लढणार याबाबतचे निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. एकदा निर्णय झाला की तो जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version