ड्रग्ज प्रकरणात पोलिसाला अटक

ड्रग्ज प्रकरणात पोलिसाला अटक

सांगवी, २ मार्च २०२४, प्रतिनिधी : पुण्याजवळच्या सांगवी गावातील एका हॉटेल कामगाराकडून दोन कोटी दोन लाख रुपयांचा एमडी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. या प्रकरणात निगडी पोलिस ठाण्यावरील विकास शेळके या पीएसआयला अर्थात फौजदाराला अटक करण्यात आली आहे. पकडलेल्या हॉटेल कामगाराची आणखी चौकशी करण्यात आली. यानंतर कामगाराकडून आणखी सुमारे ४३ किलो एमडी जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या एमडीची एकूण किंमत ४४ कोटी ७९ लाख रुपये आहे. गस्तीवरील सांगवी पोलिसांना पाहून पळणाऱ्या हॉटेल कामगाराकडील पिशवीत एमडी सापडले. यानंतर पुढील तपास सुरू झाला. अंमली पदार्थ विरोधी विभाग पुढील तपास करत आहे.

सांगवीत एमडी प्रकरणी कारवाई झाली तर पुणे शहर पोलिसांनी विश्रांतवाडी परिसरातून ३४० किलो ड्रग्जसाठीचा कच्चा माल जप्त केला. ट्रकमधून हा माल जप्त करण्यात आला. पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणातील कारवाईत नऊ जणांना अटक केले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. पुणे पोलिसांनी आतापर्यंत १८०० किलो ड्रग्ज आणि ३४० किलो ड्रग्जसाठीचा कच्चा माल जप्त केला आहे. ड्रग्जच्या आंतरराष्ट्रीय तस्करीशी संबंधित तपास केंद्रीय तपास यंत्रणा करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version