मॉरिसच्या अंगरक्षकाची जामीन मिळवण्यासाठी धडपड

मॉरिसच्या अंगरक्षकाची जामीन मिळवण्यासाठी धडपड

मुंबई, २ मार्च २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना मुंबईत ८ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली. फेसबुक लाईव्ह करून हत्या दाखवण्यात आली. मॉरिस नोरोन्हाने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. यानंतर मॉरिसने आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला अटक केली. आता अमरेंद्र मिश्राने जामीन मिळवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्याने जामीन मिळवण्यासाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. अमरेंद्रच्या जामीन अर्जाला अभिषेक यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांच्याकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यासाठी मॉरिसने अमरेंद्र मिश्राचे शस्त्र वापरल्याची माहिती पुढे आली. यानंतर पोलिसांनी मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला अटक केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version