निवासी डॉक्टरांचा संप

निवासी डॉक्टरांचा संप

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राज्यातील निवासी डॉक्टरांनी त्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत काम सुरू करणार नाही, असे निवासी डॉक्टरांनी जाहीर केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी निवासी डॉक्टरांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. निवासी डॉक्टरांच्या संघटनेशी राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी चर्चा केली. या चर्चेअंती तयार झालेला प्रस्ताव २५ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळ बैठकीत सादर होणार आहे. यामुळे संप करू नये, असे आवाहन अजित पवार यांनी निवासी डॉक्टरांना केले आहे. पण निवासी डॉक्टरांनी या आवाहनाला प्रतिसाद देण्याऐवजी संप सुरू केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version