मनोहर जोशी रुग्णालयात

मनोहर जोशी रुग्णालयात

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : माजी लोकसभाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आजारी असलेल्या मनोहर जोशी यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. शिवसेना – भाजपा युतीचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. जावयामुळे अडचणीत सापडल्यानंतर मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. नंतर शिवसेनेकडून लोकसभेत खासदार म्हणून गेलेल्या मनोहर जोशी यांनी काही काळ अवजड उद्योगमंत्री म्हणून काम केले. नंतर लोकसभाध्यक्ष म्हणून मनोहर जोशी यांनी प्रभावी कामगिरी केली. उद्धव यांच्या कार्यकाळात हळू हळू मनोहर जोशी राजकीय प्रवाहातून दूर गेले. मागील अनेक वर्षांपासून मनोहर जोशी राजकारणापासून लांब आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version