भाजपा – मनसेची खलबते

भाजपा – मनसेची खलबते

मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत झाले. यानंतर मुंबईत भाजपा आणि मनसे यांच्यात खलबते सुरू झाली आहेत. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे मनसे रालोआमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली.

मागील दीड वर्षात अधूनमधून मनसे नेते आणि भाजपा नेते यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. राज यांची भाजपा नेत्यांशी अधूनमधून चर्चा होतच आहे. पण आता भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन लगेच आशिष शेलार आणि राज यांच्यात चर्चा झाली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version