मुंबई, १४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातून राजसभेसाठी प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. याआधी अजित पवारांचा मुलगा पार्थ आणि छगन भुजबळांचा पुतण्या समीर यापैकी एकाला राष्ट्रवादीकडून महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण प्रफुल्ल पटेलांना उमेदवारी देत राष्ट्रवादीने अनेकांना चकीत केले आहे. प्रफुल्ल पटेल हे सध्या राज्यसभेवर आहेत. त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपायला तीन वर्षांचा कालावधी उरला आहे. पण एवढा कार्यकाळ बाकी असताना प्रफुल्ल पटेल यांना खासदारकीचा राजीनामा देऊन नव्याने राज्यसभेची निवडणूक लढवण्याचे निर्देश पक्षाने दिले आहेत. ही घटना देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.