भाजपाच्या महेंद्र मोरेंचा मृत्यू

भाजपाच्या महेंद्र मोरेंचा मृत्यू

जळगाव, १० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे बुधवार ७ फेब्रुवारी २०२४ रोजी भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या महेंद्र मोरेंचा नाशिकच्या रुग्णालयात मृत्यू झाला. महेंद्र मोरे यांनी शनिवार १० फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला. हल्लेखोरांनी आठ गोळ्या झाडल्या, त्यापैकी सात गोळ्या महेंद्र मोरे यांच्या शरीरात आढळल्या. या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version