दहिसर मुंबई, ०८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : शिउबाठा गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झालाय. या घटनेनं सध्या सगळीकडे खळबळ उडाली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपीचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. मॉरीस नरोना नावाच्या व्यक्तीनं अभिषेक घोसाळकर यांच्यांवर फेसबुक लाईव्ह सुरु असताना गोळ्या झाडल्या. यानंतर त्यानं स्वतःवर गोळ्या झाडत स्वतःला संपवलं. दहीसरमधील गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेत अभिषेक घोसाळकर आणि गोळ्या झाडणारा आरोपी मॉरिसभाई दोघांचाही मृत्यू झालाय.
मॉरिस कोण होता?
दहिसर ते बोरिवली परिसरातला स्वयंसेवक
निवडणूक लढण्यास प्रयत्नशील
घोसाळकर पिता-पुत्राशी यांच्याशी जुनी घसट
मॉरिस नरोन्हावर महिलेची फसवणूक केल्याचा आरोप
महिलेकडून मॉरिस नरोन्हावर बलात्काराचा आरोप
घोसाळकर यांनी बलात्काराच्या आरोपात अडकावल्याचा आरोप
गणपत पाटील नगर या झोपडपट्टीतला वादातून गोळीबार
घोसाळकर कुटुंब मातोश्रीचे निकटवर्तीय
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.