नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. आधी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवार ९ फेब्रुवारी पर्यंत होणार होते. आता संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवार १० फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत कालावधीत एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ करण्यामागचे कारण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. पण शनिवारी केंद्र सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी एक श्वेतपत्रिका अर्थात व्हाईट पेपर सादर करणार असल्याची चर्चा आहे. श्वेतपत्रिकेत २०१४ च्या आधीची आर्थिक स्थिती आणि देशाची ताजी आर्थिक स्थिती तसेच २०१४ मध्ये मोदी सरकारने शपथ घेतल्यापासून ते आतापर्यंतची स्थिती यांचाही आढावा घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची आणि आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे श्वेतपत्रिका काढून मोदी सरकार विरोधकांची राजकीय कोंडी करण्याचा तसेच आपल्या कामगिरीची माहिती देत जनतेचा जास्तीत जास्त पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.