‘राजीनामा १६ नोव्हेंबरला दिला’

‘राजीनामा १६ नोव्हेंबरला दिला’

अहमदनगर, ३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय करू नका, अशी ठाम भूमिका घेत १६ नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, असे छगन भुजबळ म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील ओबीसी मेळाव्यात बोलताना भुजबळांनी १६ नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले.

अहमदनगरच्या ओबीसी मेळाव्यात बोलताना भुजबळांनी राजीनाम्याची माहिती दिली तसेच जरांगेंवर टीका केली. ‘तुम्ही तर म्हणालात आम्हाला आरक्षण मिळालं. गुलाल उधळला. अध्यादेश हातात आला. मात्र लेकाला अध्यादेश म्हणजे काय ते कळत नाही, तसेच मसूदा म्हणजे काय ते कळत नाही. मग आता पुन्हा उपोषणाला कशाला बसता? आज चार दिवस झाले आहेत. राज्यात उन्माद सुरु आहे. रात्री तीन चार वाजेपर्यंत डीजे वाजवला जात आहे. ओबीसींच्या घरासमोर शिवीगाळ केली जात आहे. आपण जिंकलो, आम्हाला आरक्षण मिळालं. असं बोललं जात आहे, तर उपोषण कशासाठी ?’ असा सवाल भुजबळांनी केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version