मुंबई महापालिकेचा ‘एवढ्या’ कोटींचा अर्थसंकल्प

मुंबई महापालिकेचा ‘एवढ्या’ कोटींचा अर्थसंकल्प

मुंबई, २ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पालिकेचा ५९ हजार ९५४.७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी सादर केला. महापालिकेची निवडणूक झाली नसल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी प्रशासकाच्या अधिकारात अर्थसंकल्प सादर केला. आयुक्तांनी आर्थिक वर्ष २०२४ – २५ साठी हा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी महापालिकेने शिक्षणासाठी अर्थसंकल्पात ३१६७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आरोग्य, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रण यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. नागरी सुविधांसाठी अर्थसंकल्पात ३१ हजार ७७४.५९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अठरापेक्षा जास्त वयाच्या दिव्यांगांसाठी १११.८३ कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्याची तरतूद मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महापालिकेने १६०० बचतगटांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला सुरक्षेसाठी मुंबई महापालिकेने १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

एकूण महसूल उत्पन्न अंदाजे ३५७४९.०३ कोटी रुपये
एकूण महसुली खर्च अंदाजे २८१२१.९४ कोटी रुपये
एकूण भांडवली खर्च अंदाजे ३१७७४.५९ कोटी रुपये
भांडवली खर्च आणि महसूल खर्चाचे गुणोत्तर ५३ : ४७ आहे.
५८.२२ कोटी रुपयांच्या अधिशेषासह अतिरिक्त अर्थसंकल्प

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version