कोल्हापूर, १ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील पावनगडावरील अनधिकृत मदरसा जमिनदोस्त करण्यात आला. प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. मदरता जमिदोस्त करण्याची कारवाई मध्यरात्री सुरू करण्यात आली. ही कारवाई सकाळी नऊ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आली. कारवाई सुरू असताना पावनगडाच्या दिशेने जाणारे – येणारे सर्व मार्ग पोलिसांनी बंद केले होते. मागील काही दिवसांपासून मदरशात मुसलमानांच्या गुप्त बैठका सुरू होत्या. या बैठकांची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने कायद्यानुसार कारवाई केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.