नवी दिल्ली, १ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत गुरुवार १ फेब्रुवारी रोजी लेखानुदान २०२४ सादर केले. याप्रसंगी बोलताना, श्रीराम मंदिरामुळे रोजगार वाढला; असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. धार्मिक पर्यटनाला चालना देऊन त्यातून रोजगार निर्मिती करण्यासाठी तसेच अर्थचक्राला गती देण्यासाठी सरकार काम करेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले.
लेखानुदान लोकसभेत सादर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत गुरुवार १ फेब्रुवारी रोजी लेखानुदान २०२४ सादर केले. लोकसभेची निवडणूक असल्यामुळे यंदा १ फेब्रुवारी रोजी पूर्ण अर्थसंकल्पाऐवजी लेखानुदान सादर करण्यात आले. निवडणुकीनंतर नवे सरकार उर्वरित आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.