‘आमच्या विकासाच्या व्याख्येत सामान्य माणूस केंद्रस्थानी’

‘आमच्या विकासाच्या व्याख्येत सामान्य माणूस केंद्रस्थानी’

मुंबई, ३१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : आमच्या विकासाच्या व्याख्येत सामान्य माणूस केंद्रस्थानी , असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या व्हिजन २०३० या कार्यक्रमात बोलत होते. ‘जय महाराष्ट्र’चे संपादक प्रसाद काथे यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीतील एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी विकासाची कामं करत आहे. सामान्य माणसांचे भले कसे होईल त्याचे जीवनमान कसे सुधारेल याला प्राधान्य देत विकासाची कामं सुरू असल्याचे फडणवीस म्हणाले.

विकासाच्या मुद्यावर बोलत असताना मुंबईतील मेट्रो आणि मेट्रोची आरे कारशेड, समृद्धी महामार्ग हे विषयांशी संबंधित प्रश्नांनाही फडणवीस यांनी उत्तरे दिली. उद्धव यांच्यामुळे मेट्रो प्रकल्पाचे दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे फडणवीस म्हणाले. एका प्रश्नाचे उत्तर देताना ते उद्या ताजमहालवरही दावा करतील, या शब्दात फडणवीस यांनी उद्धवना टोला हाणला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version