मुंबई, ३१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मंदिर बांधूनही देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या व्हिजन २०३० या कार्यक्रमात बोलत होते. ‘जय महाराष्ट्र’चे संपादक प्रसाद काथे यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत फडणवीस यांनी सर्व प्रश्नांना उत्तरं दिली. देशाची अर्थव्यवस्था या विषयावर बोलताना त्यांनी मंदिर बांधूनही देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते, असे वक्तव्य केले.
याआधी अयोध्येत २२ जानेवारी रोजी मंदिरात प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. पंतप्रधान मोदी यांनी प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा केली. राम मंदिराच्या निमित्ताने देशभर दिवाळी साजरी झाली. रामाच्या दर्शनासाठी लाखो भाविक अयोध्येत पोहोचले. धार्मिक पर्यटनातून कोट्यवधी रुपयांची उलढाल झाली. राम मंदिराच्या निमित्ताने दररोज मोठी उलाढाल सुरू आहे. लाखो नवे रोजगार निर्माण झाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.