संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

नवी दिल्ली, ३० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवार ३१ जानेवारी २०२४ पासून सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशनात ज्या संसद सदस्यांचे सदस्यत्व निलंबित करण्यात आले त्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या आधी होत असलेले हे संसदेचे शेवटचे अधिवेशन आहे. यामुळे सर्व संसद सदस्यांनी नियमांचे पालन करून कामकाजात सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. यंदा बुधवार ३१ जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होईल. संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अभिभाषण करतील. यानंतर गुरुवार १ फेब्रुवारी २०२४ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत हंगामी अर्थसंकल्प सादर करतील. आर्थिक वर्ष २०२४ – २५ च्या पहिल्या तीन महिन्यांसाठी हंगामी अर्थसंकल्प सादर केला जाईल. निवडणुकीनंतर स्थापन होणारे नवे सरकार पुढील नऊ महिन्यांसाठीचा अर्थसंकल्प जुलै २०२४ मध्ये सादर करेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version