मुंबई, ३० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : कोविड काळातील शवपिशवी घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडी चौकशी सुरू आहे. ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात ही चौकशी सुरू आहे. किशोरी पेडणेकर या उद्धव गटाच्या समर्थक आहेत. त्यांना याआधीही ईडीने समन्स बजावले होते. पण वेगवेगळी कारणे देत किशोरी पेडणेकर चौकशीला हजर होणे टाळत होत्या. अखेर मंगळवार ३० जानेवारी रोजी किशोरी पेडणेकर ईडी चौकशीला सामोऱ्या गेल्या. ‘मी नियतीला मानते, हिशोब देईन’ असे प्रसारमाध्यमांना सांगत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडीच्या कार्यालयात गेल्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.