अयोध्या, २२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान झाले. प्रभू श्रीरामाची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि प्रमुख पुजारी या प्रसंगी मंदिराच्या गाभाऱ्यात उपस्थित होते. प्रभू राम विराजमान होताच शंखनाद करण्यात आला. वाद्य वाजवण्यात आली. मंदिरावर आकाशातून पुष्पवृष्टी करण्यात आली. रामभक्तांचे शेकडो वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. राम जन्मभूमीत पुन्हा एकदा दिमाखात राम मंदिर उभे राहिले.
महत्त्वाचे मुद्दे
प्रभू श्रीराम विराजमान
मंदिरात प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा
पंतप्रधान मोदींचा प्रभू रामाला साष्टांग नमस्कार
राम मंदिरावर हेलिकॉप्टरद्वारे आकाशातून पुष्पवृष्टी
प्राणप्रतिष्ठेच्याप्रसंगी गाभाऱ्यात पंतप्रधान मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत आणि प्रमुख पुजाऱ्यांची उपस्थिती
श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर शंखनाद, वाद्ये वाजवली
मंदिरात घुमले रघुपती राघव राजाराम भजनाचे स्वर
राम विराजमान होताच रामभक्तांनी व्यक्त केला आनंद
राम जन्मभूमीच्या आठवणींनी गहिवरले रामभक्त.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.