उद्धव गटाच्या आमदारांना न्यायालयाची नोटीस

उद्धव गटाच्या आमदारांना न्यायालयाची नोटीस

मुंबई, १७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबईच्या उच्च न्यायालयाने उद्धव गटाच्या चौदा आमदारांना तसेच विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्य विधिमंडळ सचिवालय यांना नोटीस बजावली आहे. शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेऊन उच्च न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर उद्धव गटाने विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version